राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुद्रीक कुटुंबियांचे निकटवर्तीय संबंध

कुडाळ (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुद्रीक कुटुंबियांचे असलेल्या अत्यंत निकटवर्तीय संबंधांची पुन्हा एकदा प्रचिती आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. नियोजन विभागाचे उपसचिव नितीन खेडकर यांनी प्रफुल्ल सुद्रीक यांच्या डीपीडिसी सदस्यपदी चा अध्यादेश काढला आहे. प्रफुल्ल सुद्रीक यांचे वडील दिवंगत सुरेश सुद्रीक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्गमित्र असून अत्यंत जिवलग मित्र होते.सुरेश सुद्रीक यांच्या निधनानंतरही अजितदादांनी आपल्या दिवंगत वर्गमित्र असलेल्या सुरेश सुद्रीक यांचे सुपुत्र प्रफुल्ल सुद्रीक यांना नेहमीच साथ दिली आहे. त्याचीच प्रचिती प्रफुल्ल यांची डीपीडिसी सदस्यपदी झालेल्या निवडीतुन आली आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल्ल सुद्रीक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!