तळेरे (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात ग्राहकतीर्थ बिंधूमाधव जोशी आणि ग्राहक चळवळ या विषयावर कासार्डे ज्युनि.कॉलेजची कु. रिद्धी जयेंद्र पाळेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर याच कॉलेजच्या कु.प्रितिका सदानंद चौगुले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. माध्यमिक गटात ‘ग्राहक चळवळ आणि मी’ या विषयावर निबंध सादर केलेल्या कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या कु. श्रेया विश्वनाथ घाडी हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र – सिंधुदुर्ग शाखा कणकवली सहसचिव प्रा. विनायक पाताडे तसेच मराठी विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम. डी.खाडये,प्रभारी मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर व पर्यवेक्षक एस.डी. भोसले ,ग्राहक पंचायत समितीचे राज्य सदस्य तथा जिल्हाध्यक्ष प्रा.एस एन पाटील, तालुका अध्यक्ष श्रद्धा कदम यांनी अभिनंदन केले.यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.