जिल्हास्तरीय थाळी व गोळा फेक स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजचा आर्यन तारी प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय व ज्यु. कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी त्रिमुर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे, ता. मालवण येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत मुलांच्या १९ वर्षे वयोगटात गोळा फेक, थाळी फेक या क्रीडा प्रकारात कासार्डे ज्यु. कॉलेजचा कु. आर्यन संतोष तारी याने दोन मैदानी प्रकारातू प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या खेळाडूला प्रा.विनायक पाताडे,विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा. दिवाकर पवार व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम. डी. खाडये, प्रभारी मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर ,पर्यवेक्षक एस डी भोसले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. या गुणवंत खेळाडुचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!