भडगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळीचा उपक्रम

कुडाळ (अमोल गोसावी) : ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या संस्थेच्या वतीने कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक मधील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार सहाशे रुपये ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये विद्यालयाच्या कुमार दुर्वेश सुरेश सुतार, कुमारी साक्षी गणेश सावंत, कुमारी रेणुका राजाराम खरात, कुमारी सानिका संतोष लोट, कुमारी मैथिली उल्हास लोट ह्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या शिष्यवृत्तीबद्दल संस्थाध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत, सचिव श्री. संभाजी वळंजू , मुख्याध्यापक श्री सचिन धुरी, सर्व संस्था संचालक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व ग्लोबल फाउंडेशन संस्थेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!