संस्थेतील विद्यार्थ्यांची कामगिरी अभिमानास्पद – ॲड.अनिल परब

कनेडी गट शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गाठलेली उंची ही कौतुकास्पद आहे, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर या संस्थेतील विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी अभिमानाची आहे.असे मत राज्याचे माजी परिवहन मंत्री ॲड,अनिल परब यांनी केले.

शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शनिवारी दि. २३ रोजी संपन्न झाला. याचे उद्घाटन तसेच अक्षर सिंधू व विज्ञान विश्व यांचे हस्तलिखित प्रकाशन श्री. परब यांच्या हस्ते झाले या वेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष पी डी सावंत,शिवाजी सावंत, नागेश सावंत,चेअरमन राजाराम सावंत,गणपत सावंत,तुषार सावंत व सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

श्री परब म्हणाले,”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेऊन या संस्थेने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे ‘स्किल डेव्हलपमेंट’ ‘च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी कोणती कला अवगत केली पाहिजे, कोणत्या कलेमध्ये संधी आहे हे समजून घेतले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही प्रगती पाहिल्यानंतर आपणही खारीचा वाटा उचलावा आणि ती माझी जबाबदारी आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले मी कोकणातला आहे त्यामुळे या मुलांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहणार आहे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होऊ दे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कनेडी संस्थेला आगळे वेगळे रूप मिळाले असून यासाठी अनेक जणांनी परिश्रम घेतले आहेत. संस्था नावावर रूपाला आणली आहे, या संस्थेच्या माध्यमातून लोकांचे भले करायचे आहे यावेळी सतीश सावंत यांनी प्रशालेच्या वाटचालीची माहिती दिली. प्राचार्य सुमंत दळवी यांनी प्रास्ताविक केले.प्रसाद मसुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!