चुलत भावानेच गवताच्या गंजीला आग लावून केले नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : चुलत भावनेच गवताच्या गंजीला आग लावून 5 हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद विजय शंकर राणे ( रा. हरकुळ खुर्द, भटवाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास विजय राणे यांच्या राहत्या घरामागील गवताच्या गंजीला चुलत भाऊ सुधाकर राणे याने आग लावली. विजय राणे व त्यांच्या मुलाने गंजी जवळ जाऊन पाहिले असता तिथून सुधाकर राणे पळून जात असताना दिसला. या घटनेत विजय राणे यांचे 5 हजार रुपयांचे नुकसान झाले असून सुधाकर राणे विरोधात आयपीसी 435 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.

error: Content is protected !!