कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल हायवेवर हळवल फाट्यावर आज सायंकाळी साडेसात वाजता फोर्स क्रूझर गाडी पलटी होऊन अपघात घडला .मालवणहून कोल्हापूर च्या दिशेने भरधाव वेगात जात असलेली क्रूझर गाडी ( MH 11 -BH -0115 ) चालकाचेही नियंत्रण सुटून हळवल फाट्यावर वळणावर पलटी झाली. या अपघातात क्रूझर गाडी चे नुकसान झाले असून प्रवासी जखमी झाले आहेत.
हळवल फाट्यावर अपघात ; गाडी झाली पलटी










