रक्तबंबाळ स्थितीत असलेल्या काकीला घरी नेणा-या शेजा-यांचाही फोडला दरवाजा
गवाणे येथील घटना संशयित युवकाविरूध्द गुन्हा दाखल
देवगड (प्रतिनिधी) : वडील व काकीला वरवंटा घेवून मारहाण करीत असताना रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या काकीला वाचवुन घरी घेवून गेलेल्या गवाणे तांबळवाडी येथील जान्हवी राणे यांचा घराचा दरवाजा फोडल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच प्रतिक विजय मेस्त्री(२६) याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वा.सुमारास घडली.
गवाणे तांबळवाडी येथील प्रतिक विजय मेस्त्री यांनी सकाळी १० वा.सुमारास वडील विजय मेस्त्री यांना डोक्यावर व हातावर मारहाण करून जखमी केले.यावेळी त्यांना सोडविण्यासाठी काकी आशा मोहन मेस्त्री ही धावून गेली परंतू प्रतिक याने रागाबरोबर तिच्या डोक्यात वरंवटा मारला.यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यावेळी शेजारी राहणा-या जान्हवी रविंद्र राणे यांनी त्या ठिकाणी जावून रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या आशा मेस्त्री यांना तात्काळ आपल्या घरी नेले व दरवाजा बंद करून घेतला.ते पाहून प्रतिक यांने त्यांचा घरी जावून बंद असलेला दरवाजा फोडला.ही घटना.जान्हवी राणे यांनी तळेरे बाजारपेठ येथे गेलेले त्यांचे पती रविंद्र लहू राणे यांना फोनवरून सांगीतली.त्यानंतर त्यांनी याबाबत देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी वडील व काकी यांना मारहाण करून जखमी करून तसेच शेजारी राहणा-या रविंद्र राणे यांच्या घराचा दरवाजा फोडल्याप्रकरणी प्रतिक याच्याविरूध्द भादवि ३२४,५२७,३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.हे.कॉ.आशिष कदम करीत आहेत.












