डोक्यात लोखंडी मोज ने प्रहार करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : महिलेच्या डोक्यात लोखंडी मोज ने प्रहार करून जखमी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर गंगाराम सावंत ( रा. साटेली तर्फ सातार्डा ) या चा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री एच बी गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला. आरोपी ज्ञानेश्वर सावंत हा दारुचा व्यसनी असुन तो अतिशय रागिट व खुनशी स्वभावाचा आहे.तो काहि कारण नसतांना वाडितील लोकांना शिवीगाळी व दमदाटि करीत अस दि.२९/०८/२०२२ रोजी १२.३० वा.चे मानाने रागाने फिर्यादि यांना लाकडि दांडयाने मारहाण केलेला होती. त्याचा जाब विचारण्यासाठी व समजाविण्यासाठी वरील ता. वेळी व जागी फिर्यादि यांची वहिनी सौ.ललिता लवु नाईक हि, तिचा नवरा व ईतर नातेवाईकांसह तसेच फिर्यादि व त्यांचे अन्य नातेवाईक असे आरोपी ज्ञानेश्वर सावंत याचे घरासमोर जावुन त्याला समजावत असतांना दुपारी ०१.०० वा.चे सुमारास ज्ञानेश्वर सांवत याने तेथे गेलेल्या सर्वांना शिवीगाळी करत, मला काहि सांगायचे नाहि असे म्हणत तो घरातुन बाहेर आला व दरवाज्याचे समोर उभी असलेली फिर्यादि यांची वहिनी ललिता लवु नाईक वय- ४५ वर्षे हिला उददेशुन, “थांब आता तुला मारुनच टाकतो’ असे म्हणत तीला जीवे ठार मारण्याचे उददेशाने त्याने स्वतःचे उजव्या हातात असलेली लोखंडि मोज दोन्ही हाताचे सहाय्याने पकडुन फिर्यादि यांची वहिनी ललिता हिचे डोक्यावर मारुन तीला गंभीर जखमी केले होते. या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर सावंत हा न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. ऱ्याला हरकत घेत सरकारी वकील देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. गायकवाड यांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!