बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या कॅशियर सौ दीपा रानडे यांचा सेवानिवृत्ती निमीत्त सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण या शाखेच्या कर्मचारी तथा कॅशियर कम क्लार्क सौ दीपा उर्फ संजीवनी संतोष रानडे या दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी बँकिंग सेवेतून सेवानिवृत्त होत असल्या कारणाने नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी विविध शेत्रातील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे मॅनेजर गणेश शिवथरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,व्यापारी असो.अध्यक्ष प्राजल कुबल, सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, मंगेश गुरव,संतोष पाटणकर,संदेश धुमाळे,भाऊ राणे, सुधीर कुबल, संजय धाक्रस,लियाकत काझी,शेखर राणे,मोहन गेहलोत ज्येष्ठ कार्यकर्ते मधू आणा देवस्थळी,अनिल देवस्थळी,अनंत गांधी,बँकेचे माजी कर्मचारी संतोष रानडे,भाई पारकर, दत्ताराम गुरव,मानाजी कांबळे, राऊत यांसह बँकेचे विद्यमान उप शाखा व्यवस्थापक कविन डी, बँकेचे कर्मचारी दिनकर नर,प्रकाश पेडणेकर,सुनील पाटील, अमोल गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण व्यापारी असोसिएशन च्या वतीने तसेच आजी व माजी बँक कर्मचारी यांच्या वतीने सौ.दीपा रानडे यांचा सेवानिवृत्त निमीत्त शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अनुशांगाने अनंत गांधी,मंगेश गुरव,संतोष पाटणकर, अनिल देवस्थळी,संजय धाक्रस यांनी आपले मनोगत व्यक्त करत सौ रानडे यांना शुभेच्छा दिल्या.

” बँक ऑफ महाराष्ट्र व खारेपाटण येथील सर्व ग्रामस्थ हे मी माझे कुटुंब समजत आले असून या कुटुंबाच्या आर्थिकतेचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी समजून काम करत आले.आपण माझ्या आजपर्यंतच्या सेवेच्या ३९ वर्षाच्या काळात दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही.आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते.” असे भावपूर्ण उ्दगार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटणच्या सेवानिवृत्त कॅशियर तथा कर्मचारी दीपा संतोष रानडे यांनी त्यांच्या सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमात बोलताना काढले.

error: Content is protected !!