कोल्हापूर न्यू कॉलेजची विद्यार्थिनी गौरी गणेश साळोखे शूटिंग खेळातील स्पर्धेत पटकावले एअर पिस्टल रौप्य पदक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,भोपाळ इथं सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूर च्या गौरी गणेश साळोखे हिनं शूटिंग खेळातील 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावलंय. तिनं 400 पैकी 381 गुण मिळवून 17 वर्षाखालील वयोगटात ही उज्वल कामगिरी केली. ही स्पर्धा 27 डिसेंबर 2023 पासून भोपाळ (मध्यप्रदेश) इथं सुरूय. गौरी हि न्यू कॉलेजची विद्यार्थिनी व बालेवाडी पुणे क्रीडा प्रबोधिनीची रहिवासी खेळाडू आहे. तिला क्रीडा प्रशिक्षक संदीप तरटे, सुहास पाटील, प्रा. अमर सासने यांचं मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!