पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र च्या वसई विरार ता.अध्यक्ष सुरेखा कोकरे यांनी समर्थ आश्रमात केला वाढदिवस साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : पोलीस मित्र संघटना महाराष्ट्रच्या सक्रीय कार्यकर्त्या व वसई विरार तालुका अध्यक्ष सुरेखा कोकरे यांनी त्यांचा वाढदिवस नुकताच जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमात मित्र मंडळींसह साधेपणाने साजरा केला.जीवन आनंद संस्थेने विरार रेल्वे स्टेशनला दि.१६ डिसेंबर,२३ रोजी आयोजीत केलेल्या स्वच्छता मोहिमेतून सुरेखा कोकरे या समर्थ आश्रमला जोडल्या गेल्या आहेत.

जीवन आनंद संस्थेचे आश्रम, शेल्टर होम आणि बालकांसाठीची डे केअर सेंटर ही जनतेच्या पाठिंब्यावर चालतात. आणि म्हणून आश्रमातील बांधव आणि आपण कार्यकर्ते हे समाजाचे देणे लागतो. अशी भावना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी वेळोवेळी प्रांजळपणे व्यक्त केली आहे आणि याच भुमिकेतून संस्था सातत्याने ठिकठिकाणी विशेषतः सार्वजनिक वापराच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करीत असते. अशा मोहिमांद्वारे समाजातील अनेक निस्वार्थी व्यक्ती आणि कार्यकर्ते संस्थेच्या कार्याला जोडले जातात असा संस्थेचा नेहमीचा अनुभव राहिला आहे…..आणि अशाच प्रकारे सुरेखा कोकरे या समर्थ आश्रमला जोडल्या गेल्या.असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

समाजातील नागरिकांची सुरक्षितता आणि निराधार वंचितांच्या न्याय्य हक्क व सन्मानासाठी सुरेखा यांचे हातून मोठे कार्य व्हावे. त्यांना परमेश्वराने सुदृढ आयुरारोग्य द्यावे अशी सदिच्छा व प्रार्थना पोलीस मित्र संघटनेतील उपस्थीत स्नेहीमित्र, आश्रमचे कार्यकर्ते व बांधवांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस मित्र संघटना महाराष्ट्रचे गितेंद्र मिर्लेकर- पालघर जिल्हा अध्यक्ष , जयेश पाटील – पालघर तालुका अध्यक्ष, सुरेखा कोकरे -वसई विरार तालुका अध्यक्ष, सुप्रिया पिंपळे- वसई विरार तालुका प्रभारी, श्वेता गोमाने -वसई विरार तालुका प्रवक्ता , सुषमा पाटील- वसई विरार तालुका उपाध्यक्ष, शुभांगी वांचू -वसई विरार तालुका उपाध्यक्ष , राजेश गुप्ता -वसई तालुका उपाध्यक्ष , सानिका शेलार- वसई विरार तालुका सहसचिव , प्रगती परब -वसई विरार तालुका सरचिटणीस , सुचिता पडवळ- वसई विरार तालुका सरचिटणीस, आशा भगत- वसई विरार तालुका कार्याध्यक्ष , विद्या पटेल- वसई विरार तालुका सल्लागार इ.मान्यवर उपस्थीत होते.

error: Content is protected !!