दाजीपूर मधील होम स्टे मध्ये जुगारावर पोलिसांची धाड

फोंडाघाट, सावंतवाडी, कुडाळ मधील जुगारींवर गुन्हा दाखल ; राजकीय पदाधिकाऱ्यासह काहींना वगळल्याची चर्चा

क्रेटा कारसह 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (रोहन भिउंगडे) : वर्ष अखेर साजरा करत जुगार खेळणाऱ्यांवर राधानगरी पोलिसांनी 31 डिसेंम्बर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास दाजीपूर ओलवन येथील ऋषिकेश होम स्टे वर धाड टाकून क्रेटा कारसह 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या धाडीत 7 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यात सावंतवाडी कुडाळ फोंडाघाट मधील आरोपींचा समावेश आहे. दरम्यान पोलिसांच्या या धाडीत मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यासह अन्य महत्वाचे मोहरे वगळले गेल्याची चर्चा आहे. दाजीपूर ओलवन मार्गावर ऋषीकेश होम स्टे मध्ये जुगार सुरू असल्याची खबर राधानगरी पोलिसांना मिळाली.त्यानुसार छापा मारला असता जुगार खेळताना रंगेहाथ आरोपीना पकडण्यात आले. त्यात किशोर वासुदेव सामंत ( वय 34, रा फोंडाघाट ), प्रदीप अर्जुन पाटील ( वय 49, रा. माठेवाडा, सावंतवाडी ), प्रकाश दत्तात्रय साळवी ( वय 38, रा फोंडाघाट बाजारपेठ ) आनंद चनाप्पा मेठी ( वय 38, भवानी मंदिरनजीक, कुडाळ ), बाळू अशोक बाणे ( वय 32, झर्येवाडी फोंडाघाट ) मिलिंद श्रीधर कुबडे ( वय 45, फोंडाघाट ) सागर अनंत खंदारे ( ओलवन ) यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात 72 हजार रोख रक्कम, 25 हजार रुपये किंमतीचे मोबाईल, क्रेटा कार ( MH 07 AG 6428 ) जप्त करण्यात आली आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर बारस्कर यांनी दिली असून अधिक तपास घेरडीकर करत आहेत.

error: Content is protected !!