माधवबागचे खास पंचकर्म शिबीर
दि. २ जानेवारी ते 31 जानेवारी 2024 वेळ : स. 10 ते सायं 6.00 वा.
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी च्या वतीने पित्ताच्या त्रासावर मात करण्यासाठी खास पंचकर्म शिबिराचे आयोजन 2 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत स.10 ते सायं 6.00 वा. च्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. छातीत जळजळणे , आंबट ढेकर येणे, मळमळणे, गळ्यात जळजळ होणे, उलटी होणे पोटात गॅस तयार होणे, पोट दुखणे, पोट जड होणे,छातीत दुखणे, श्वासाला दुर्गंधी येणे, तोंडात अल्सर येणे, थकवा वाटणे, चक्कर येणे आणि पूर्ण शरीराला खाज येणे अशी पित्ताची लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी खास पंचकर्म थेरपी रू.1400 ची थेरपी फक्त 699 रू. मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. विरेचन पंचकर्म थेरपीमध्ये स्नेहन स्वेदन क्रियेद्वारे शरीरातील दोष कोष्टामध्ये ( आमाशय – पक्काशय) येतात व बस्ती -विरेचन क्रियेद्वारे दोष शरीराच्या बाहेर काढले जातात. या पंचकर्म उपचाराद्वारे आपण पित्त विकारांवर मात करू शकतो. नाव नोंदणी आवश्यक असून संपर्कासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा. कणकवली 937318 3888, कुडाळ 9011328581, सावंतवाडी 7774028185













