चिंदर भगवंत गड किल्ला संवर्धना बाबत झाली सकारात्मक चर्चा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चॅत चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेद्र हडकर सहभागी
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गांवचा मानबिंदू असलेल्या चिंदर भगवंत गड किल्यावरील पडझड झालेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराचा विषय बरेच महिने चर्चॅत आहे. काही दिवसा पूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनीही मंदिराची पहाणी केली होती.
भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण याच्या उपस्थितीत पर्यटन सेक्रेटरी मनीषा म्हसकर यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली.त्यांच्या समवेत जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, ता सरचिटणीस महेश मांजरेकर, राजू परुळेकर, विजू निकम, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेरमन देवेन्द्र हडकर, किल्लेदार जुवेकर आदी उपस्थित होते.