अध्यक्षपदी सिद्धार्थ तांबे तर कार्याध्यक्षपदी सुचिता गायकवाड, सचिवपदी सूर्यकांत चव्हाण
कणकवली (प्रतिनिधी) : अपरांत साहित्य कला प्रबोधिनीची कणकवली तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्रा. सिद्धार्थ गोपाळ तांबे, कार्याध्यक्ष सुचिता दामोदर गायकवाड सचिव सूर्यकांत परशुराम चव्हाण(फोंडाघाट), उपाध्यक्ष कल्पना मलये व सुरेश राघो कांबळे यांची तर सहसचिव रूपाली तुकाराम कदम, हिशोब तपासणीस दीपक वामन कांबळे (सांगवे), संघटक किशोर देवू कदम निवड झाली. तर कार्यकारणी सदस्य म्हणून निलेश सदानंद पवार(अभिनेता) सुदीन सुरेश तांबे, दीपक तळवडेकर, मिलिंद सर्पे, स्नेहल सुनील तांबे, आनंद बालाजी तांबे,संजय गोपाळ जाधव,अर्पिता मुंबरकर, सल्लागार पी. जे.कांबळे व डॉ.बी.एल.राठोड यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणी नियुक्तीच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव राजेश कदम व जिल्हा कार्यकारणी सदस्य जनीकुमार कांबळे, बौद्ध धम्माचे अभ्यासक गोपी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.












