ग्लोबल फाउंडेशन तर्फे पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती प्रदान

चौके ( अमोल गोसावी ) : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या संस्थेतर्फे भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके विद्यालयातील पाच हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये कुमारी योगिता चव्हाण, कुमार केशव चव्हाण, कुमारी अमिता चव्हाण, कुमार विकास नाईक आणि कुमार पारस मानवर या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये रोख रक्कम जमा करण्यात आली.

गेली अनेक वर्षे ग्लोबल फाउंडेशन पिंगळी या संस्थेतर्फे हुशार होतकरू विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आर्थिक मदत दिली जाते. अनेक विद्यार्थ्यांनी या मदतीचा फायदा आपल्या शैक्षणिक विकासासाठी करून घेतला आहे. ग्लोबल फाउंडेशन चे संचालक प्रसाद परब तसेच गुरु देसाई व अन्य सहकाऱ्यांच्या सहयोगातून शाळेमध्ये नेत्र तपासणी शिबिर सुद्धा भरविले जाते. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होतो. यानिमित्त चौके स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका सौ. रसिका गोसावी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांनी या मदतीबद्दल ग्लोबल फाउंडेशन संस्थे प्रती आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!