शिक्षक भारतीची जिल्हा शिष्यवृत्ती सराव परीक्षा 28 जानेवारी रोजी होणार

तळेरे (प्रतिनिधी): शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले . रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11.30 यावेळेत सराव परीक्षा घेतली जाणार आहे.परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील.पेपर क्रमांक एक सकाळी 8.00 ते 9.30 9.30 ते 10 मधली सुट्टी. पेपर क्रमांक दोन 10 ते 11.30 परीक्षा फीरु.60/- राहील. परीक्षा केंद्रे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच 50 परीक्षार्थी संख्या असलेल्या शाळेत परीक्षा केंद्राची सोय करण्यात येईल. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आवाहन करण्यात येते की प्रतिवर्षीप्रमाणे ही परीक्षा दर्जेदार पद्धतीने घेतली जाईल तरी आपल्या पाल्यांना सरावासाठी या परीक्षेसाठी बसवावे व त्याचा फायदा विद्यार्थी वर्गाने घ्यावा असे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, सचिव समीर परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!