मुंबई येथील गणपतराव कदम मार्ग म्युनिसिपल सेकंडरी प्रशालेत २१ जाने. रोजी शिक्षक माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुरुवंदना कार्यक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई लोअर परेल येथील गणपतराव कदम मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल प्रशालेच्या आजी- माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन व गुरुवंदना-२ सोहळा प्रशालेच्या तळमजल्यावरील मुख्य सभागृहात रवि. दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत, ईशस्तवन, प्रास्ताविक, परिचय, अल्पोपहार, माजी विद्यार्थ्यांचे मनोगते, शिक्षकांची मार्गदर्शनपर मनोगते, गुरुदक्षिणा प्रदान, आभारप्रदर्शन, राष्ट्रगीत, स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी या सोहळ्याला ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होऊन गाणी, जादूचे प्रयोग, वाद्य वाजविणे, मिमिक्री करणे, स्टँड अप कॉमेडी, मनोगते, डान्स, भजन, कीर्तन, पोवाडे आदी स्वतःची कला सादर करायची असेल त्यांनी १९ जानेवारी पर्यंत दत्ता कदम – ९९३०८४८३९९, प्रशांत जामसंडेकर – ८१०८९३१३०४, संजय हिंदळेकर – ९७०२६९९९७५,नरेश चीतकेली ९८२०७५०७२७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.तसेच हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!