टेम्बवाडी ते चौंडेश्वर मंदिर रस्ता उजळला प्रकाशझोतात

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका मेघा सावंत यांची कार्यतत्परता

कणकवली (प्रतिनिधी) : टेम्बवाडी ते चौंडेश्वर मंदिर दरम्यान डीपी रोड च्या सुरू असलेल्या कामामुळे स्ट्रीट लाईट बंद होत्या. वर्दळीच्या या रस्त्यावर स्ट्रीट लाईट अभावी नागरिकांची गैरसोय होत होती.याबाबत माजी नगरसेविका मेघा महेश सावंत यांनी तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडे केली होती.माजी नगरसेविका मेघा सावंत यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी प्रशासकीय हालचाली करून या मार्गावर स्ट्रीट लाईट उभारून घेतले. ऐन काळोखात स्ट्रीट लाईट सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसह ये जा करणाऱ्या महिला वर्ग आणि जेष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. स्ट्रीट लाईट सुरू करत नागरिकांची गैरसोय दूर केल्याबद्दल माजी नगरसेवक  समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका मेघा महेश सावंत यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

error: Content is protected !!