खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरगावणे या गावातील विविध रस्ते विकास रस्ते कामांचा शुभारंभ भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य तथा बांधकाम वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,कणकवली पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर,भाजप खारेपाटण शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,माजी पं.स. सदस्य सौ.तृप्ती माळवदे,भा तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र लाड, कुरगावने – बेर्ले गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच बबलू पवार, बूथ अध्यक्ष संजय लाड,प्रकाश जाधव,महावीर गोसावी,बाबला गोसावी,स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर,संजय मांजरेकर,उदय बारस्कर,शेखर कांबळी,नारायण कदम,पांडुरंग गोठणकर,शिवाजी गाडे,धनाजी पवार व बापू गोठणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कुरगावणे गावातील खैराटवाडी मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे,कुरगावणे गोठणकरवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच कुरगावणे पाटणबाव ते चव्हाटा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे आदी कामे मंजूर करण्यात आली होती. या सर्व कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











