दुष्काळ निवारण्यासाठी, जलसंधारण उपाय योजने अंतर्गत लोकसहभागातून, वनराई बंधारे , जलतारा प्रकल्प यशस्वीरित्या राबवू या – पालकमित्र अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे !

देवघर प्रकल्प कालव्याचे पाणी उगवाई नदीतून कणकवली पर्यंत सोडल्यास कणकवलीचा पाणी दुष्काळ संपेल – ग्रामस्थांनी लक्ष वेधले

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी, प्रशासनाचे अधिकाऱ्यांकडे पालकमित्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कणकवली तालुक्यासह फोंडाघाट गावच्या पालकमित्र म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे कडे कार्यभार देण्यात आला आहे. त्यांनी आजवर दुर्लक्षित, तसेच पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील फोंडाघाट- गावात येऊन, ग्रामपंचायतच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात सरपंच सदस्य तसेच जि.प./ प.स.सदस्य आणि ग्रामस्थांची भेट घेतली…

औपचारिक स्वागत जि. प. सदस्य राजन चिके, सरपंच संजना आग्रे यांनी केल्यानंतर, अप्पर जिल्हाधिकारी व पालकमित्र शुभांगी साठे यांनी सिंधुदुर्गातील दुष्काळी परिस्थितीवेळी पाणीटंचाई होणार नाही, यासाठी वनराई बंधारे, जलतारा सारखे लोकसहभागातून उपाययोजना, ग्रामपंचायत व वाड्यावरील ग्रामस्थ, पाटबंधारेविभाग, कॉलेज विद्यार्थी यांच्या सहकार्यातून, तातडीने उभारावेत. स्त्रोत पाहून जलसाठा करावा. ज्यामुळे विहिरीतील पाणी पातळी वाढून दुष्काळाचा प्रभाव कमी होईल. सेवा माझे योगदान, सेवा संकल्प अभियानांतर्गत यशस्वी राबविण्याने गाव पातळीवर दुष्काळाचा झळा येणाऱ्या काळात कमी होतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांनी केले. त्यानंतर जि. प. सदस्य राजना चिके, ग्रामस्थ एकनाथ कातरुड, सुदेश लाड, विश्वनाथ जाधव, भाई तावडे, राजू पटेल, राजन नानचे, सुजाता हळदीवे इ.नी गावचा पाणीपुरवठा, सुलभ व्यवस्था, देवघर पाणीपुरवठा, लोरे धरणातून पाण्याचे नियोजन, भूमीग्रस्तांचा रेंगाळलेला मोबदला प्रश्न, यावर आपले विचार स्पष्ट केले. गेली वीस वर्ष देवघर पाटबंधारे धरणाच्या कालव्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केल्यास, आणि उगवाई नदीतून सोडल्यास मध्यंतरीच्या गावासह कणकवलीकरांच्या गावांची तहान भागेल. कालव्याचे पाणी लोरे तलावात दुष्काळी वेळी सोडल्यास फोंडाघाट, लोरे, वाघेरी ला पाणीटंचाई भासणार नाही. याची तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. मात्र या बाबी गेली कित्येक वर्षे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणूनही, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, हे निदर्शनास आणले. दुष्काळी शेत पिकांच्या पंचनाम्यात सातबारा वरील इपिक होत नसल्याचे व ॲग्री स्टॅक आयडी नसल्याबद्दल चे नियमांमध्ये शिथिलता देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी त्यांचे सोबत प.स. सदस्य पवन भालेकर, उपसरपंच तन्वी मोदी व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सभापती हर्षदा वाळके, कृषी अधिकारी बरकड, शिवसेना उपनेते संजय आग्रे ,संदेश पटेल, आबू पटेल, माजी सभापती सुजाता हळदिवे, मंडल अधिकारी प्रवीण मोंडे, मंडळ कृषी अधिकारी दुर्वा झुलपे,उपकृषी अधिकारी मानसी वेर्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षया परब इत्यादी उपस्थित होते. त्यानंतर बांधावर जाऊन पालकमित्र शुभांगी साठे यांनी शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या नुकसानीची आणि परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला…

error: Content is protected !!