विवीध कार्यक्रमासह दशक्रोशितील पालख्यांच्या आगमनाने खारेपाटण शहर दुमदुमले…
खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील दैवस्थनापैकी महत्वाचे स्थान असलेले श्री देव रवळनाथ केदारेश्वर मंदिर गुरववाडी,खारेपाटण या मंदिरातील मूर्तीच्या वज्रलेप विधीकरीता मूर्तीवरील तत्व उतरविणे,वज्रलेप करणे,प्रसाद वास्तू व होमहोवन करणे,तत्वहोम करणे,परिवार देवतांची पुनप्रतिष्ठपना करणे,आरती,महाप्रसाद व पालखी सोहळा या सोहळ्याला नुकताच प्रारंभ झाला.खारेपाटण दशक्रोषितील विविध पालख्या गावकरी व मानकऱ्यानसह उपस्थित होत्या. त्यामुळे संपूर्ण खारेपाटण परिसर भक्तीमय वातावरणात डूबून गेलं होता.
खारेपाटण श्री देव रवळनाथ केदारेश्वर मंदिर येथील वज्रलेप उस्तव सोहळ्याला दी.२३ डिसेंबर २०२३ ला सुरवात झाली होती.तर दी.६ जानेवारी २०२४ पासून श्री देव रवळनाथाच्या मुख्य उस्तवांला सुरवात करण्यात आली. असून दी.१० जानेवारी २०२४ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला श्री.देव केदारेश्वर धनी रवळनाथ वज्रलेप समिती खारेपाटण चे अध्यक्ष संकेत शेट्ये,उपाध्यक्ष मधुकर गुरव,सुभाष ठाकूरदेसाई, सचिव – साईप्रसाद शेट्ये,नंदकिशोर कोरगावकर, खजिनदार – संजय धाक्रस,यांसह वतनदार १२/५ मानकरी,ग्रामस्थ याबरोबरच खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रमाकांत राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री देव रवळनाथ मंदिरातील सर्व देव देवतांच्या मुर्त्या वज्रलेप केल्यामुळे उजळून निघाल्या असून मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई तसेच मंदिरासमोर लावण्यात आलेली छान फूलझाडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.एकंदरीत वज्रलेप करणे मुर्ती प्राणप्रतिष्ठापना करणे या सोहळ्यामुळे केदारेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
या सोहळ्यानिमीत्त वायगणी गावचे श्री देव आदिनाथ पालखी, नडगिवे गावच्या श्री देव गांगेश्वर,शेर्पे गावची काळेश्र्वरी देवीची पालखी गुंजवणे गावच्या श्री देव गांगेश्र्वर देवाची पालखी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतशबाजीत आज खरेपाटण मध्ये दाखल झाल्या.या सर्व पालख्यांचे व ग्रमस्थांचे श्री देव रवळनाथ वज्रलेप समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
खारेपाटण रवळनाथ मंदिर येथील उस्तवाला विविध मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.दि.८ जानेवारी २०२४ ते दी.१० जानेवारी २०२४ सलग तीन दिवस भाविक व ग्रामस्थासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री देव केदारेश्वर धनी रवळनाथ मंदिर वज्रलेप समितीच्या वतीने सागण्यात आले.तर या उस्तवमध्ये खारेपाटण मधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
















