सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : वाळू उपसा करणारा कामगार सकलदीप पुरसा सिंह ( रा. झारखंड ) याच्या मानेवर फावड्याने प्रहार करून त्याचा खून केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी भिकाजी बाळकृष्ण पवार ( रा. चिपी, ता. मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी चौथ्यांदा फेटाळला. याकामी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला. हा गुन्हा देवली खाडीपात्रात 20 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता घडला होता.आरोपी केशव गावडे व भिकाजी पवार यांना 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली होती.न्यायालयीन कोठडीत आरोपी भिकाजी पवार याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी हरकत घेत जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी यशस्वी युक्तिवाद केला. त्यानंतर जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. एच बी गायकवाड यांनी आरोपी भिकाजी पवार चा जामीन अर्ज नामंजूर केला.












