आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावातील जागृत देवस्थान श्री जयंती देवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव 14 जानेवारीला होणार असून नामांकित श्री दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग रात्रौ ठिक 11 वाजता श्री जयंती देवी मंदिर येथे होणार आहे तरी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान कमिटी व बारापाच मानकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












