कुडाळ तालुक्यात मनसेत उभी फूट.?

प्रमुख माजी पदाधिकाऱ्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र.!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नववर्षाच्या सुरुवातीलाच मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्यासह सावंतवाडी,दोडामार्ग व मालवण येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र जोर धरू लागले आहे. मनसे संघटनेत उभी फूट पडलेली दिसून येत आहे.पक्ष निरीक्षकांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून कुडाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये कुडाळ तालुका माजी सचिव राजेश टंगसाळी,माजी सरपंच आपा मांजरेकर,माजी उपतालुकाध्यक्ष बाळकृष्ण ठाकूर (वेताळ बांबर्डे जि.प. विभाग,सदाशिव गुरव (आंब्रड जि. प. विभाग), विभाग अध्यक्ष रामा सावंत,श्रीपाद अडसुळे,प्रमोद परब,उपविभाग अध्यक्ष दत्तात्रय गावडे,गणपत परब,रवी सावंत,अनिल कसालकर,शाखाध्यक्ष निलेश मांजरेकर,नारायण परब,नितीन जाधव,आनंद चव्हाण, भूषण भोगवेकर,संदीप तांबे, कसाल शहर अध्यक्ष आंब्राव फर्नांडिस यासंह तालुक्यातील २७ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाला राम राम केल्याने मनसे संघटनेला मोठा फटका बसला असून जिल्ह्यात पुढील काही दिवसांत राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!