खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना नेमकी कोणाची ? या प्रश्नाचे कोडे अखेर उलगडले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात गेली बरेच महिने पक्ष संघटना मान्यते वरून न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर नुकताच विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व कार्यकर्ते यांची असलेली संघटना हीच खरी शिवसेना असा निर्णय दिला. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी खारेपाटण येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
खारेपाटण एस टी बस स्थानक येथे शाळा स्थानक येथे शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा विजयाचा आनंद एकमेकाला पेढा भरवून व्यक्त केला. तर कै.हिंदुहृदसम्राट सम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे सदैव आमच्या सारख्या छोट्या – मोठ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्यामुळेच अखेर आज विजय हा सत्याचा झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांनी यावेळी दिली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करताना गुरव पुढे म्हणाले की,आजचा निकाल हा ऐतिहासिक असून अखेर खरी शिवसेना ही आमचीच बाळासाहेबांची शिवसेना आहे.व बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी आहे.त्यामुळे या निर्णयाचे आमच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील जनता स्वागत करत आहे.













