गोव्याच्या धर्तीवर कणकवलीत कला अकादमी व्हावी – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रस्ताविकातून मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, कणकवली शहरात गोव्याच्या धर्तीवर कला अकादमी निर्माण व्हावी. यासाठी लागणारी जमीन सुद्धा आरक्षित आहे. कला अकादमी साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी द्यावा. आमदार नितेश राणेंमुळे हा भव्यदिव्य कणकवली पर्यटन महोत्सव संपन्न होत आहे. नगरपंचायत वर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे, केंद्रीयमंत्री राणेंनी पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी येऊ शकते हे ओळखून सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा घोषित केला. राणे साहेबांची शिकवण आम्हाला असून त्यातूनच आम्ही हा पर्यटन महोत्सव भरवत आहोत. कणकवली शहरात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण करत आहोत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणेंच्या पाठबळामुळे मागील दीड वर्षभरात भरघोस विकासनिधी कणकवली नगरपंचायत ला मिळाला. त्यामुळे सत्ताकाळातील अडीच वर्षातील निधीचा बॅकलॉग भरून निघाला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, बाबू गायकवाड, बंडू गांगण, संजय मालंडकर,भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते उपस्थित मान्यरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उदघाटन प्रसंगी मनोवेधक फटाक्यांच्या आतिषबाजीं करण्यात आली होती. सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले तर आभार बंडू हर्णे यांनी मानले.

error: Content is protected !!