हिट अँड रन कायद्याच्या विरोधात

खारेपाटण रिक्षा चालक – मालक संघटनेच्या वतीने पाळण्यात आला एकदिवसीय बंद

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील रिक्षा चालक – मालक संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण एक दिवस सर्व रिक्षा बंद ठेऊन केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेलेला हिट अँड रन कायद्याचा कडाडून विरोध करून शांतपणें बंद पाळण्यात आला. खारेपाटण रिक्षा चालक – मालक संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच एक लेखी सह्यांचे निवेदन खारेपाटण पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी खारेपाटण दशक्रोशितील रिक्षा चालक – मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर रिक्षा चालक – मालक संघटनेच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात केंद्रसरकारने वाहन चालकांच्या विरोधात नवीन केलेल्या कायद्यानुसार वाहनचालक १० वर्षे सजा व दंड अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.पूर्वी वाहन चालकास एखादा अपघात झाल्यास जमीन मिळत होता. आता अन्यायकारक जाचक अशा कायद्यानुसार १० वर्षाची शिक्षा झाल्यास त्या वाहन चालकांच्या कुटुंबाचे काय होईल ? तसेच बहुतेक अपघातामध्ये वाहन चालकांची चूक नसताना देखील जमावाकडून त्याला मारहाण केली जाते. या सर्व बाबींचा विचार करता केंद्र सरकारने बनविलेल्या हिट अँड रन कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचा व राज्य व देश पातळीवरील सर्व चालकांच्या बंदला आम्ही समर्थन करत असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे. तर आज संपूर्ण दिवस रिक्षा चालकांनी बंद ठेवल्यामुळे सर्वत्र खारेपाटण मध्ये शुकशुकाट पसरला होता.तर खारेपाटण एस टी बस स्थानक परिसरतील गजबजलेले रिक्षा स्टँड आज सूने – सूने झाल्यासारखे वाटत होते.काही प्रमाणात खारेपाटण येथील नागरिकांची रिक्षा बंद मुळे थोडी गैरसोय देखील झाली.

error: Content is protected !!