वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील बंड्या मांजरेकर मित्र मंडळ यांच्यावतीने रविवार दि. १४ जानेवारी रोजी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव माळ (तरळे – वैभववाडी मार्ग) नाधवडे या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला कणकवली, देवगड वैभववाडी मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास – ३५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास – २० हजार रुपये, चौथ्या क्रमांकास – १५ हजार रुपये व आकर्षक ढाल देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच इतर रोख बक्षीसे व ढाल देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी एक हजार रुपये इतकी राहणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या बैलगाडा मालकांनी दया तानवडे – ८७८८५४४५९४, राजू शिंदे – ७९७७५५६८२५ यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेला स्पर्धकांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बंड्या मांजरेकर यांनी केले आहे.












