कणकवली पोलिसांकडून खारेपाटण येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संपन्न

कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात असून अमली पदार्थांच्या विळख्यात सध्या अनेक तरुण-तरुणी व नागरिक सापडत आहेत.याबाबतची जनजागृती करून त्याला आळा घालण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यामार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम नुकतीच खारेपाटण येथील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन राबविण्यात आली.

आज खारेपाटण येथे कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव व कणकवली पोलीस सहकाऱ्यांसोबत खारेपाटण एस टी बस स्थानक व बाजारपेठ येथे “अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली”काढून खारेपाटण येथील कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र करून अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम काय आहेत त्याचा भविष्यावर आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संपूर्ण खारेपाटण शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.

खारेपाटण येथे पोलिसांमार्फत काढण्यात आलेल्या जनजागृती रॅली मध्ये कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, पो.कॉस्टेबल-रंजित दबडे,राजकुमार आघाव,राजकुमार पाटील,सागर जाधव ,मकरंद माने ,खारेपाटण पोलीस दुरक्षेत्र अंमलदार पोलीस नाईक -उध्दव साबळे, पोलिस कॉस्टेबल-पराग मोहीते ,खारेपाटण गाव पोलीस पाटील -दिगंबर भालेकर,बेर्ले पोलीस पाटील- रतन राऊत तसेच खारेपाटण गावचे सरपंच प्राची इस्वलकर,सदस्य गुरुप्रसाद शिंदे,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते तसेच या जनजागृती रॅली मध्ये खारेपाटण विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सुद्धा या सहभागी झाले होते.

error: Content is protected !!