भरधाव कारच्या धडकेत वागदेत वृद्धाचा मृत्यू ; अपघातानंतर कारसह चालकाचा पोबारा

कारसह चालकाला पोलिसांनी अथक प्रयत्नांनी घेतले ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी): गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत वागदे येथील सत्यवान महादेव तोरसकर यांचा मृत्यू झाला. तोरसकर हे रस्ता क्रॉस करून आपल्या घराच्या दिशेने येत असताना 13 जानेवारी रोजी रात्री साडेआठ च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तोरसकर यांना तात्काळ माजी सरपंच रुपेश आमडोस्कर, स्थानिक ग्रामस्थांनि उपजिल्हा रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात कारचालकाने कारसह घटनास्थळावरून पलायन केले होते. पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ सर्व चेकपोस्ट वर अपघाताची माहिती देऊन अलर्ट केले होते. मात्र अपघात स्थळी अंधार असल्याने सीसीटीव्ही कॅमेरामध्येही काच फुटलेली कार दिसून येत नव्हती. अखेर रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारसह चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!