खारेपाटण चेकपोस्टवर 14 लाख 74 हजारांच्या अवैध दारुसह 24 लाख 74 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कणकवली पोलिसांची तडफदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी): खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या 14 लाख 74 हजार 560 रुपयांच्या अवैध दारुसह 10 लाखांचा ट्रक असा एकूण 24 लाख 74 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला. 13 जानेवारी रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्र. ( RJ 27 GD 9271 ) मधून अवैध दारूची वाहतूक होत होती. खारेपाटण चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी सुरू असताना सदर ट्रक चालक लक्ष्मण भगाराम रेबारी ( वय 43, रा आमेट राजस्थान ) यांच्याकडे गाडीची कागदपत्रे सोबत सापडली नाही, तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता हौद्यात 512 बॉक्समधील प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिली. मापाच्या 48 अशा एकूण 24 हजार 576 बाटल्या आढळून आल्या. ट्रकचालक लक्ष्मण रेबारी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एपीआय मनोज पाटील करत आहेत.

error: Content is protected !!