मीनाक्षी कदम यांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

कणकवली ( आनंद तांबे ): शिक्षक भारती संघटनेमार्फत आमदार कपिल पाटील आणि अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यामार्फत मीनाक्षी कदम यांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे शिक्षक भारती संघटना सावित्री फातिमा यांची जयंती दरवर्षी साजरी करतात या यावर्षी सदर कार्यक्रम मित्रधाम सभागृह किर्तीमल हॉटेलच्या जवळ परेल मुंबई येथे साजरा करण्यात आला या जयंतीचे औचित्य साधून मीनाक्षी कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!