शिवसेना संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस केला साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांचा वाढदिवस आज कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, विलास साळसकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त हरेश पाटील यांचे सर्वांनी अभिष्टचिंतन केले.













