कुरंगवणे किरण इलेव्हण च्या वतीने मुंबई मिरारोड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावातील किरण इलेव्हण कुरंगवणे यांच्या वतीने मुंबई येथील मिरा रोड येथे नुकत्याच मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ रविवार दी .१४ जानेवारी २०२४ रोजी कुरंगवणे गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते मिरा रोड येथे करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच बबलू पवार,बाबू जाधव,अरविंद जाधव हे खास करून गावाहून मुंबईला क्रिकेट स्पर्धेला आपल्या गावातील खेळाडूंना प्रोस्थाहन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी पश्चिम कुरंगवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे,सेक्रेटरी बंड्या लाड, खजिनदार रवींद्र मांजरेकर आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुरंगवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई चे कार्यकर्ते,सभासद व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!