श्री जयंती देवी मंदिर परिसरातील मल्लखांबचे लोकार्पण
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिर परिसरात मल्लखांब या क्रीडा प्रकारास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिर परिसरात ११ फूट उंचीचा मल्लखांब रोवला गेला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले मोबाईल मध्ये रमलेली दिसतात. हीच समस्या ओळखून पळसंब येथील जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब ( रजि) यांनी या मुलांना मैदानात आणण्याचा त्यांचे मल्लखांब कौशल्य आणि त्यांची शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्याचा या माध्यमातून निश्चय केला आहे. या मल्लखांब उभारणीसाठी राजा परब, धोंडी गावडे, दिनेश साईल,शेखर पुजारे, बबन सावंत,चंद्रकांत गोलतकर, दाजी जुवेकर, पुंडलिक मेस्त्री, विशाल मेस्त्री यांनी मेहनत घेतली. पळसंब गावचे प्रतिष्ठित नागरिक अण्णा कापडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मल्लखांबाचे लोकार्पण झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, सरपंच महेश वरक, पदाधिकारी अमरेश पुजारे, हितेश सावंत, चंद्रकांत गोलतकर, शेखर पुजारे, वैभव परब, अमित पुजारे, बबन पुजारे, अक्षय परब, दत्तगुरु परब, कपिल मुणगेकर, रुपेश पुजारे, विवेक पुजारे, आजिव सभासद शैलेश पुजारे अथर्व गोलतकर तसेच ग्रामस्थ मुबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.