एस एम जुनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एस. एम. ज्युनि. कॉलेज कणकवली येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मा. प्राचार्य जी. एन. बोडके सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कॉमर्स मधून कु. पुर्वा घाडी व सायन्स मधून कु. हर्ष कदम कु. पार्थ करंगुटकर कु.पार्थ सावंत कु. सानवी भालेकर या अकरावीतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

याप्रसंगी प्रमुख वक्ते महेश प्रभू यानी युवकांना जीवनात योग्य दिशा मिळण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याविषयी विशेष मार्गदर्शन केले व आयुष्यात आईचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी. एन. बोडके सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याकरिता स्वामी विवेकानंदांचे विचार जीवनात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले.

कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन मा. डॉ. एस. एन.तायशेटे, सचिव मा.श्री. डी .एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष श्री.एम. ए. काणेकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक चंद्रहास हिर्लेकर यांनी केले व सूत्रसंचालन व आभार मिलिंद गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!