अवकाळी पाऊस पडल्यामुळे फळपिक विम्याचा फायदा शेतक-यांना मिळणार असे फळपिक विमा कंपनीने जाहिर करावे

देवगड (प्रतिनिधी) : नुकतेच अवकाळी पावसाने देवगडमध्ये थैमान घातल्यामुळे मोठया प्रमाणात याचा फटका आंबा बागायतदार शेतक-यांना बसला आहे. यामुळे नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतक-यांना पंचनामे करुन शासनाकडुन तातीने मदत करावी. अशी मागणी प्रसिध्द आंबा बागायतदार व युवा उदयोजक प्रशांत शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

प्रसिध्दीपत्रकामध्ये असे नमुद केले आहे की, गेल्या आठवडयामध्ये देवगड तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे आंबा बागायतदारांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. कलमांवरती आलेला मोहोर काळा पडून मोहोर जळून गेला आहे. तसेच काहि कलमांवरती फळधारणा झाली होती. हि आंबा फळे गळून नुकसान झाले आहे. यामुळे लाखो रुपये फवारणीचा खर्च वाया गेला आहे. तसेच तालुक्यातील बहुसंख्य आंबा बागायतदारांनी फळपिक विमा काढलेला आहे. 1 नोव्हेंबर ते 15 मे पर्यंत अवकाळी पाऊस,गारपीठ,कमी जास्त तापमान,झाल्यास या फळपिक विम्याचा फायदा शेतक-यांना होत असतो यामुळे यावर्षी जानेवारीच्या पहिलया आठवडयामध्ये अवकाळी पाऊस देवग्ड तालुक्यामध्ये पडला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी अवकाळी पावसामुळे फळपिकविमा शेतकरी बागायतदारांना मिळणार असे जाहिर करावे. फळपिक विमा कंपन्यांवरती शासनाने नियंत्रण नसल्यामुळे अनेकवेळा या फळपिकविमा कंपन्यांनी नुकसान होवूनही शेतकरी बागायतदारांना याचा फायदा दिला नसल्याची नोंद देखील आहे. अनेकवेळा अवकाळी पाऊसच पडला नसल्याची फळपिक विमा कंपन्यांकडे नोंद नसल्याचे गेल्या काहि वर्षाचा ईतिहास पाहता दिसून आले आहे. यामुळे यावर्षी अवकाळी पाऊस पडल्यामुळे फळपिक विम्याचा फायदा शेतक-यांना मिळणार असे फळपिक विमा कंपनीने जाहिर करावे. अशी मागणी आंबा बागायतदार प्रशांत शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

error: Content is protected !!