अखेर माईन गावात खणाणली मोबाईल रिंग

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची शब्दपूर्ती

सरपंच नितीशा पाडावे, भाजपा बूथ अध्यक्ष नितीन पाडावे यांचा यशस्वी पाठपुरावा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील माईन गावात अखेर मोबाईल ची रिंग वाजली असून बी. एस. एन. एल चा टॉवर ऍक्टिव्ह झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी माईनवासीयांना दिला शब्द पूर्ण केला असून माईन सरपंच नितीशा पाडावे, भाजपा बूथ अध्यक्ष नितीन पाडावे यांचा यशस्वी पाठपुरावा कामी आला आहे. माईन हे कणकवली तालुक्यातील दुर्गम खेडेगाव असून मोबाईल टॉवर नसल्याने गावात आजवर मोबाईल रेंज नव्हती. माईन गावात बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर व्हावा यासाठी सरपंच नितीशा पाडावे आणि भाजपा बुथ अध्यक्ष नितीन पाडावे यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी माईनवासीयांच्या मोबाईल टॉवर मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला प्रशासकीय प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार माईन गावात बी.एस.एन.एल टॉवर गतवर्षी मंजूर केला होता. सदर मोबाईल टॉवर चे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभरातच मोबाईल टॉवर ऍक्टिव्ह सुद्धा झाला. प्रसंगी सरपंच नितीशा पाडावे, ग्रा प सदस्य निलम गावकर, दिपाली आडेलकर, शास्वती राणे, वैभवी तांबे, अमोल घाडीगावकर, भाजपा बूथ अध्यक्ष नितीन पाडावे, पोलीस पाटील नारायण गावकर, आनंद बिर्जे, प्रशांत आडेलकर, सुरज घाडीगांवकर, वसंत चव्हाण, बाळकृष्ण गावकर, प्रकाश परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!