पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांची रोखठोक भूमिका
25 मे नंतर वातावरण बदलानुसार दोन दोन दिवसाची टप्याटप्प्याने वाढ करावी
आचरा (प्रतिनिधी) : इंग्रजाच्या काळा पासून अस्तित्वात आलेल्या इंडियन व्हेसलं ऍक्ट 1917 मध्ये मोठया कार्गो, प्रवासी बोटी यांना लागू असलेला 25 मे ते 31 ऑगस्ट हा जलवाहतूकसाठी बंदी कालावधी लागू असलेला नियम पुढे करून कोकणातील जलपर्यटनासाठी घातक असून त्यामध्ये स्थानिक भागातील हवामान किनार पट्टीवर गेल्या 15 वर्षात पर्यटन बोट याचा विचार करून व स्थानिक पर्यटन व्यावसायिक यांना विश्वासात घेऊन बदल करणे ही काळाची गरज आहे. खोल समुद्रातून जाणाऱ्या कार्गो, प्रवासी बोट यांना पावसाळी हवामान बदलामुळे सुरक्षित बंदर गाठणे कठीण होऊन बोटीचे व मनुष्यहानी होऊ शकते हे मान्य आहे परंतु हाच नियम सरसकट लावून किनारपट्टी ला लागून तसेच नदी खाडी किनारी जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या स्थानिक पर्यटन व्यवसायाला लावून एन पर्यटन हंगाम बहरत आलेला असताना व्यवसाय समुद्री वातावरणाचा कुठलाही अंदाज न घेता बंद करणे संयुक्तिक नाही सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा घोषित करून अनेक जलपर्यटन पॉलिसी बनविणे चालू आहे पर्यटन व्यवसायाईक महासंघ म्हणून गेली 4 ते 5 वर्षे सातत्याने या विषयी पाठपुरावा चालू आहे. अनेक वर्ष खराब समुद्री वातावरण, वादळे या मुळे मे महिन्यातील सागरी पर्यटन 25 मे पूर्वीच खराब झाल्यामुळे जलपर्यटन व्यवसाय बंदी कालावधी येण्यापूर्वीच स्थानिक पर्यटन व्यवसायिकानी बंद केला अनेक वर्षानंतर या मे महिन्यात निसर्गाच्या साथीने वातावरण चांगले असून पर्यटन हंगाम बहरत समुद्री वातावरण चांगले असल्याने अनेक वर्षानंतर कोकणाच्या किनारपट्टीवर मे महिन्यात जलपर्यंटना सोबत अन्य पर्यटन क्षेत्राशी जोडलेल्या व्यवसायिकांचा व्यवसाय चांगल्या स्थितीत चालू आहे. अश्या स्थितीत राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन किनारपट्टीला लागून व्यवसाय करत असलेल्या स्थानिकांचा विचार करून सिंधुदुर्ग किल्ला वाहतूक, वॉटर स्पोट हयांना किनापट्टीच्या वातावरणाचा विचार करून बंदी कालावधी 25 मे ही मुदत वाढवून 10 जून पर्यंत करावी ही मुदत देताना 25 मे नंतर वातावरण बघून 2 दिवसाची टप्याटप्प्याने वाढ करावी कोकणातील पर्यटन वाढीसाठी इंग्रजाच्या काळापासून चालू असलेल्या इंडियन व्हेसलं एक्ट 1917 स्वतंत्र भारताच्या गरजे नुसार बनविणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन जलपर्यटनावर अवलंबून आहे. किल्ला वॉटर स्पोट बंद झाले तर जिल्ह्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटकं अन्य ठिकाणी जाऊन जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय विस्कळीत होईल या विषयी राज्य सरकारने पर्यटन व्यवसायिकांच्या सोबत राहणे गरजेचे आहे. अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे.












