कुडाळ (प्रतिनिधी) : गुरुश्री अकॅडमी तर्फे कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी सभागृहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जिल्हा परिषद पांडुरंग शेठ पडते वाडी शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी कुमार रुद्र राहुल कानडे यांने पाचवी रॅंक प्राप्त करून यश प्राप्त केले. त्याला अविनाश भिसे ,सौ. पालव मॅडम, मर्गज मॅडम यांचे तसेच मुख्याध्यापिका सुरेखा कदम व वर्गशिक्षिका गार्गी नाईक-परब यांचे मार्गदर्शन मिळाले.
जि.प.पांडुरंग शेट पडतेवाडी शाळेचा विद्यार्थी रुद्र कानडे ने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मिळवीले यश












