मुंबई – सावंतवाडी नव्या रेल्वे सेवेमुळे मिळणार मोठा दिलासा

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे जाहीर आभार

वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी ही नवीन रेल्वे सेवा सिंधुदुर्गातील प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार आहे. या रेल्वेला वैभववाडी येथे थांबा देण्यात आल्याने तालुक्यातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सेवेसाठी खासदार नारायणराव राणे व नामदार नितेश राणे यांचे वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी आभार मानले.

दरम्यान, वैभववाडी येथे जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या गाड्यांना थांबा मिळाल्यास मुंबई, कोकण तसेच इतर भागांत प्रवास करणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
या रेल्वे सुविधांबाबत सोशल मीडियावर उबाठा गटाकडून श्रेय लाटण्याची धडपड सुरू असल्याचा आरोप सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. जनतेच्या सुविधांसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा करून श्रेय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैभववाडी तालुक्यातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!