एक्साईज कणकवलीच्या पथकाने 6 लाखांच्या अवैध दारुसह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

भेंडवडे , हातकणंगले येथील आरोपी नितीन ज्ञानदेव वासुदेव सह स्विफ्ट कार ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते पवारवाडी येथे फोंड्याच्या दिशेने जाणा-या वाहनाची तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईनुसार एकसिल्वर रंगाची स्वीप्ट कार क्रमांक MH-१२-LV-९६९१ मध्ये विविध प्रकारचे विदेशी मदयाची वाहतूकहोत असताना गोवा राज्य निर्मिती दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा राज्यनिर्मित विदेशी मदयाचे विविध बॅण्डचे ३९ बॉक्स जप्त करण्यात आले. मिळून आलेल्या मदयाचीअंदाजे किंमत रु. ६,१०,१३०/- व कारची किंमत रु. ६,००,०००/- व इतर मुद्देमाल असा एकूण रु.१२,१०,१३०/- किंमतीचा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालक नितीन ज्ञानदेव
वासुदेव, वय ३४ वर्षे रा. भेंडवडे वासुदेव गल्ली स्मशान भूमीजवळ, ता. हातकंणगले जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयांचा तपास चालू आहे.

सदर’ कारवाई विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, व किर्ती शेडगे, अधीक्षक सिंधुदूर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नितीन शिंदे,स्नेहल कुवेसकर व अजित गावडे जवान व हेमत वस्त जवान-नि-वाहनचालक यांनी सदरची कारवाई केलेली असून त्यांमध्ये मदतनीस म्हणून साजीद शहा, सल्लाउद्दीन खान यांनी मदत केली.सदर गुन्हयाचा पुढील तपास नितीन शिंदे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कणकवली करीत आहेत.

error: Content is protected !!