फोंडाघाट नामदेव शिंपी समाजातर्फे नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : विठुरायाचा आवडता भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा६७६ वा संजीवनी समाधी सोहळा, फोंडाघाट बाजारपेठेतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. सकाळी ११ वाजता श्री जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथमेश कल्याणकर यांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजा व नामदेव महाराज पूजन पार पडले .त्यानंतर महाआरती होऊन सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी हरिपाठ आणि रात्री स्थानिक सुस्वर भजने आयोजित करण्यात आली होती.यावेळी समस्त नामदेव शिंपी समाजाचे अबाल वृद्ध तसेच ग्रामस्थ, भाविक यांनी उपस्थित राहून सोहळा यशस्वी केला..

error: Content is protected !!