कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 19 ऑगस्ट हा दिवस सर्व फोटोग्राफर बांधवांसाठी खूप विशेष असतो. हा दिवस संपूर्ण जगभर फोटोग्राफी डे म्हणजेच जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फोटोग्राफर असोसिएशन कणकवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी असोसिएशन मार्फत कणकवली येथे वेडिंग फोटोग्राफी (लग्न समारंभातील अविस्मरणीय क्षण) या विषयावर जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा व या दिवशी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे संघटनेमार्फत आवाहन करण्यात आले आहे. छायाचित्र प्रदर्शन दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ठीक दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल व त्याच वेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडेल.
‘वेडिंग फोटोग्राफी’च्या अविस्मरणीय क्षणांना मिळणार व्यासपीठ; कणकवलीत जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा












