सुप्रसिद्ध भजनी बुवा समिर कदम यांचा भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार २०२४ “अष्टपैलू भजन सम्राट” पुरस्काराने सन्मान…!

मैत्री संस्था, मुंबई मित्र, साई अर्पण फाउंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार, भजन महर्षी कै. काशीराम परब बुवा‌ यांचे व सुशिल गोठणकर बुवा यांचे शिष्य, लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण ता. कुडाळ चे सुप्रसिद्ध भजनी बुवा समिर कदम यांना मैत्री संस्था, मुंबई मित्र, साई अर्पण फाउंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार २०२४ मध्ये “अष्टपैलु भजन सम्राट” या पुरस्काराने शिर्डीचे शिवसेना खासदार वाकचौरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समिर कदम बुवांच्या “बुवा समिर कदम ऑफिशियल” या युट्युब चॅनलवर नुकताच “मन धाव घेई चरणी- २०२४” हा पाच भजन गीतांचा अल्बम प्रदर्शित झाला आहे. लोकांचा त्या गाण्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. समिर कदम यांच्या सत्कार बद्दल त्यांचे यासाठी शिवसेना खासदार शिर्डी वाकचौरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!