अपहरण मारहाण आणि रॉबरी च्या गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ अत्तार, सुहास घोगळे चा जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : प्रवाशाचे अपहरण करून त्याला मारहाण करत त्याच्याकडील रक्कम आणि मोबाईल लूटल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ जमिल अत्तार ( रा कलमठ, मुस्लिमवाडी ) , सुहास गुरुदास घोगळे ( रा. कलमठ गुरववाडी ) या दोन्ही आरोपींचा जामीन प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एच बी गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. रिक्षाचालक आरोपी अल्ताफ अत्तार आणि त्याचा सहकारी सुहास घोगळे यांनी फिर्यादी धीरेंद्रकुमार यादव याला रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने त्याचे कणकवली शहरातील पटवर्धन चौकातून 25 डिसेंबर 2023 रोजी अपहरण करून त्याच्याकडील बँक एटीएम काढून घेऊन एटीएममधून रक्कम काढून वापरली तसेच त्याचा मोबाईलही पळवल्याची फिर्याद दाखल केली होती.तत्कालीन पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकआर जे गाडेकर , पीएसआय अनिल हाडळ यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून दोन्ही आरोपीना जेरबंद केले होते. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन्ही आरोपीनी जामीन अर्ज सादर केला होता. जामीन अर्जाला हरकत घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी हरकत घेत दोन्ही आरोपीने जामीन मिळलायस सरकारी तसेच खाजगी साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, आरोपी अल्ताफ वर यायाधी एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल असून तो पावणे दोन महिने जेलमध्ये होता. त्याने जेलमधून सुटल्यावर हा गुन्हा केला आहे, जामीन मिळाल्यास आरोपींकडून पुन्हा दखलपात्र गुन्हा घडू शकतो हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.

error: Content is protected !!