गोळवण शाळा नंबर १ येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल व शाळा व्यवस्थापन समिती गोळवण नं 1 च्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे डॉक्टर संदीप साळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी शिक्षक व पालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .या आरोग्य शिबिरात विद्यार्थी व पालक शिक्षक यांचे हिमोग्लोबिन तपासणी विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी ,विद्यार्थी पालक व शिक्षक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सिस्टर वर्दम यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले तसेच किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी मुलींना व माता पालकांना ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल च्या वतीने सॅनीटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला सॅनी पॅड डिस्पोज मशीन देण्यात आली .यावेळी सरपंच श्री सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, माजी उपसरपंच साबाजी गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास परब ,उपाध्यक्ष ज्योती मसुरकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता चिरमुले, केंद्रप्रमुख ज्युनिस गावीत,सिस्टर लोबो, आरोग्य कर्मचारी ,पालक, ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे ,सहकारी शिक्षक संजय परुळेकर, नम्रता पावसकर, संजय जाधव उपस्थित होते.

error: Content is protected !!