चौके (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कट्टा व पेंडूर विभागीय कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी दिपप्रज्वलन करुन तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना झिंदाबाद, बाळासाहेब परत या, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत जयंती साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे या दिवसाचे औचित्य साधुन केंद्रशाळा कट्टा नं. 1 येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक भोगटे, तालुका उपाध्यक्ष बाळ महाभोज, ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी शाखाप्रमुख विजय वाईरकर, अरुण पावसकर, मिलिंद जामसंडेकर, श्वेता सावंत, ग्रा. प सदस्य वंदेश ढोलम, युवा सेनेचे दर्शन म्हाडगुत, प्रसाद रेवडेकर शेखर रेवडेकर, बाबू टेंबुलकर, निलेश हडकर, सोमनाथ माळकर, जगदीश मोरजकर, नितीन राऊळ, किशोर पेंडुरकर, किशोर भगत, बाळ भोजने, तुकाराम डगरे, दिलीप हंजनकर, अरुण गावडे, धनंजय वांगणकर, उपेंद्र बोड्ये, आबा सावंत, सुरेश भोजने व अन्य कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.














